MSRTC Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज कुठे पाठवायचा आहे आणि कसा भरायचा आहे याबाबतची सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये मिळून जाईल. पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा अर्ज सादर होणार नाही. ही भरती एकूण 436 पदांसाठी होत आहे.
MSRTC Recruitment Details
एकूण पदसंख्या: 436 पदांसाठी भरती होत आहे.
रिक्त पदांची नावे आणि पदसंख्या:
- मेकॅनिक मोटर वाहन – एकूण 206 जागा
- शीट मेटल कामगार – एकूण 50 जागा
- मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स – एकूण 36 जागा
- मेकॅनिक डिझेल – एकूण 100 जागा
- वेल्डर ( गॅस आणि इलेक्ट्रिक) – एकूण 20 जागा
- चित्रकार (सामान्य) – एकूण 04 जागा
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – एकूण 20 जागा
शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे:
- संबंधित क्षेत्रात आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- एस.एस.सी. ( इयत्ता.10वी ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा:
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 14 ते 38 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट दिली जाणार.
परीक्षा फी:
या वर्षासाठी परीक्षा फी सुद्धा असणार आहे तर ती खालील प्रमाणे:
- खुला प्रवर्ग – 590 रुपये/-
- मागासवर्गीय – 295 रुपये/-
मासिक वेतन:
9,433 रुपये ते 10,612 रुपये इतके मासिक वेतन मिळणार.
नोकरी ठिकाण:
महाराष्ट्र (नाशिक)
अर्ज करण्याची पद्धत:
उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता.
अर्ज मिळण्याचा पाठविण्याचा पत्ता:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग कार्यालय एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक – 422001.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागातील रा.प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय.
महत्त्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ | https://msrtc.maharashtra.gov.in/ |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
पदांची आवश्यकतेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याच्या लिंक
पदांचे नाव | Apply Online |
मेकॅनिक मोटार वाहन | येथे क्लिक करा |
शीट मेटल कामगार | येथे क्लिक करा |
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स | येथे क्लिक करा |
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) | येथे क्लिक करा |
चित्रकार (सामान्य) | येथे क्लिक करा |
मेकॅनिक डिझेल | येथे क्लिक करा |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | येथे क्लिक करा |