HDFC Scholarship Program 2024: विद्यार्थ्यांना HDFC बँक देत आहे 75,000 रुपये स्कॉलरशिप! फक्त या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

HDFC Scholarship 2024 in Marathi: विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण HDFC Scholarship 2024 हा ECSS Scholarship Program 2023-24 नवीन प्रोग्राम HDFC Bank ने सुरू केलेला आहे. HDFC Bank Scholarship हा प्रोग्राम सुरू करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देणे आहे. तसेच ही शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे आणि जे डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, UG आणि PG (सामान्य आणि व्यावसायिक) प्रोग्राम घेत आहेत.

HDFC Scholarship Program 2024
HDFC Scholarship Program 2024

ECSS कार्यक्रम अंतर्गत जे विद्यार्थी वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांमुळे किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे ते स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी (HDFC Scholarship Amount) 75,000/- रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024

तुम्हाला तर माहितीच आहे की HDFC Bank ही भारतातील सर्वात आघाडीची बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदाता आहे. ही शिष्यवृत्ती योजना त्याच्या प्रमुख कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे.

एचडीएफसी शिष्यवृत्ती पात्रता:

एचडीएफसी बँक शिष्यवृत्ती पात्रता: विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ खाली पात्रता असणे आवश्यक आहे.

  • एचडीएफसी शिष्यवृत्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी सध्या इयत्ता पहिली ते बारावी, डिप्लोमा,आयटीआय आणि पॉलिटेक्निक अशा अभ्यासक्रमांमध्ये खाजगी सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेला आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षेमध्ये किमान 55% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केलेले असावी तसेच अर्जदार विद्यार्थ्यांचे वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागला. आणि या संकटामुळे त्यांचे शिक्षणाचे खर्च ते उचलू शकत नाही तसेच त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका निर्माण होत आहे अशा विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप साठी सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल.

एचडीएफसी बँक शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार विद्यार्थ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाचे गुणपत्रक
  • ओळखीचा पुरावा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड, पॅन कार्ड
  • चालू वर्षाच्या शिकत असलेल्या शैक्षणिक प्रवेशाचा पुरावा जसे की फी भरलेली पावती, बोनाफाईड सर्टिफिकेट, प्रवेश पत्र, ओळखपत्र
  • अर्जदाराचे बँकेचे पासबुक / रद्द केलेला चेक.

HDFC Bank Scholarship 2024 Last Date

या स्कॉलरशिप प्रोग्राम साठी अर्ज करण्याची तारीख खाली दिलेली आहे.

  • Cycle 1: September 4, 2024 
  • Cycle 2: October 30, 2024 
  • Cycle 3: December 31, 2024 

विद्यार्थी मित्रांनो या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवसाची मुदत दिलेलीआहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्या.

HDFC Bank Scholarship 2024 Apply Online

एचडीएफसी शिष्यवृत्ती योजना अर्ज कसा करायचा ? : या स्कॉलरशिप प्रोग्राम साठी खालील पद्धतीने अर्ज करू शकता.

  • मित्रांनो खाली तुम्हाला ऑनलाईन अर्जची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून त्यांचे अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • त्यानंतर तुम्हाला तिन Categories दिसतील, (School, undergraduate, PostGraduate) यापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीत येत असाल तेथे Apply Now या बटनावरती क्लिक करून Login With Google वर क्लिक करा.
  • यानंतर  तुमची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती भरुन महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्व माहिती एकदा तपासा कागदपत्रे बरोबर अपलोड केलेत का ते पण तपासा आणि फॉर्म सबमिट करा.
  • सर्व केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुम्हाला याबद्दलच्या डिटेल वेळोवेळी तुमच्या मेल वर मिळत जातील.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल वरून या एच डी एफ सी स्कॉलरशिप प्रोग्राम साठी अर्ज करू शकता.
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *