Indian Overseas Bank Vacancy 2024: इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिससाठी एकूण ५५० जागा उपलब्ध आहेत. यातील २९ जागा या महाराष्ट्रात असून यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज सादर करू शकतात. तसेच इच्छुक उमेदवारांनी १० सप्टेंबर २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. या अप्रेंटिसशिप साठी पदवीधर उमेदवार पात्र आहेत. अप्रेंटिसशिप सुरू असताना उमेदवाराला दर महिन्याला १५ हजार रुपये स्टायपेंड मिळेल.
Indian Overseas Bank Bharti 2024:
इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये ५५० रिक्त जागांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिसशिपसाठीची ५५० पदे भरली जातील. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या रिक्रुटमेंट बोर्डाने जाहीर केल्यानुसार या रिक्त जागा या संपूर्ण देशात उपलब्ध असलेल्या रिक्त जागा आहेत. यातील २९ रिक्त पदे ही महाराष्ट्र राज्यात आहेत. इच्छुक उमेदवार या भरतीत ऑनलाइन पद्धतीने त्यांचा अर्ज सादर करून सहभागी होऊ शकतात. हा अर्ज सादर करण्यासाठी १० सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख ठरवून देण्यात आली आहे.
Indian Overseas Bank, Age Limit:
वयोमर्यादा-या अप्रेंटिसशिप पदाच्या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. वय वर्ष २० ते २८ वर्षे या वयोगटातील सर्व उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात. ओबीसी वर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत तीन वर्षांची सवलत मिळेल, तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना या वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळेल.
Indian Overseas Bank, Application Process:
अर्ज प्रक्रियाइंडियन ओव्हरसीज बँकेत महाराष्ट्रात अप्रेंटिसशिप या पदांसाठी सुरू असलेल्या या भरतीतील अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल. उमेदवार १० सप्टेंबर २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात. हा अर्ज सादर करण्यासाठी अर्ज शुल्क आकारण्यात येईल.
वर्ग आणि त्यानुसार अर्ज शुल्क:
खुला वर्ग, ओबीसी, इडब्ल्यूएस – ९४४ रुपयेएससी, एसटी आणि महिला उमेदवार – ७०८ रुपयेपीडब्ल्यूडी उमेदवार – ४७२ रुपयेअर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वरती नमूद केलेले अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्ज शुल्क भरण्यासाठी २८ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
या भरती बद्दल अधिक माहिती
https://www.iob.in/upload/CEDocuments/iobApprentices_Web_Ad_Final_28082024.pdf या लिंक वर क्लिक करून इंडियन ओव्हरसीज बँकेत सुरू असलेल्या या भरती संदर्भातील नोटिफिकेशन पाहता येईल आणि या भरतीविषयीची सविस्तर माहिती जाणून घेता येईल.