Tata Capital Pankh Scholarship Yojana: विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण टाटा कॅपिटल पंख अंतर्गत जी योजना राबवली जात आहे त्यात सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते.
टाटा कॅपिटल योजना या योजनेअंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे? यासाठी कोणत्या वर्गातील विद्यार्थी पात्र असणार आहे? तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Tata Capital Pankh Scholarship Yojana
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येत असतील तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. टाटा कॅपिटल या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन तुम्ही तुमचे पुढील शिक्षण सुरू ठेवू शकता. टाटा कॅपिटल योजना ही इयत्ता सहावी ते बारावी तसेच पूर्व पदवी साठी ही योजना राबवली जात आहे.
टाटा कॅपिटल पंकज शिष्यवृत्ती मेरिट कम मिन्स वर आधारित एक कार्यक्रम आहे. याचा उद्देश समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत सहावी ते बारावी पासून ते पूर्व पदवी स्तरापर्यंतचे विविध अभ्यासक्रमाची शिक्षण शुल्काचे समावेश यामध्ये आहे. विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती टाटा कॅपिटल लिमिटेड अर्थातच टाटा समूहाची वित्तीय सेवा कंपनी आहे. त्यांच्या सीएसआर या उपक्रमाचा एक हिस्सा ही टाटा कॅपिटल योजना आहे.
टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती या योजनेचा फक्त भारतीय विद्यार्थ्यांनाच याचा लाभ होणार आहे. तसेच विविध श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्रे आणि इतर पात्रता निकष इत्यादी सर्व गोष्टींची माहिती खाली दिलेली आहे.
Tata Capital Pankh Scholarship Scheme Eligibility
Tata Capital Pankh Scholarship Scheme या योजनेसाठी इयत्ता सहावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत:
- अर्जदार विद्यार्थी हा सर्वप्रथम भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये इयत्ता सहावी ते बारावी मध्ये शिकत असला पाहिजे.
- अर्जदार विद्यार्थी मागील पात्रता परीक्षांमध्ये किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.
टाटा कॅपिटल पंकज शिष्यवृत्ती योजना व्यावसायिक पदवी पूर्व साठी पात्रता
- अर्जदार मान्यता प्राप्त संस्थेमध्ये अभियांत्रिकी वैयक्तिकीय कायदा यासारख्या व्यावसायिक पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रमात नोंदणी केलेला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी किमान 60% गुणांसह 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे
- टाटा कॅपिटल आणि बडी फोर स्टडी चे कर्मचारी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाहीत याची नोंद घ्यावी..
टाटा कॅपिटल शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे-
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- चालू वर्षाची शैक्षणिक फी भरलेली पावती
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड इ.
- उत्पन्नाचा पुरावा: पगाराची स्लिप, फॉर्म 16A सरकारी प्राधिकरणाकडून मिळकत प्रमाणपत्र इ.
- मागील वर्षाचे मार्कशीट
- प्रवेश पुरावा शाळा कॉलेज: ओळखपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते तपशील इ.
टाटा कॅपिटल पंकज शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रिया
टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील पद्धतीने अर्ज करायचा आहे:
- टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- Buddy4study या पोर्टलला तुम्हाला भेट द्यावी लागेल.
- पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि पासवर्ड इत्यादी गोष्टी विचारल्या जातील त्या सर्व तिथे व्यवस्थित भरायचे आहे आणि तिथे तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी करताना तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून Verify करून घ्या.
- नोंदणी झाल्यानंतर तुमच्यासमोर नवीन अर्ज ओपन होईल ते अर्ज विचारलेले संपूर्ण माहिती तेथे व्यवस्थितपणे भरून घ्या.
- अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी सर्व विचारलेले कागदपत्रे देते अपलोड करा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा या पद्धतीने तुमचा अर्ज सादर होईल.
- वरती दिलेल्या पद्धतीने तुम्ही टाटा कॅपिटल पंच शिष्यवृत्ती या योजनेसाठी अर्ज करू शकता.